आदिवासी भाषांचे एआय आधारित पहिले भाषांतर App लाँच
नवी दिल्ली, दि. 1 : आदिवासी मंत्रालयाने आज ‘आदि वाणी’ च्या बिटा आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. ‘आदि वाणी’ हे भारतातील पहिल्या आदीवासी भाषांसाठीचे एक एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) आधारित भाषांतराचे माध्यम आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या समरसता हॉलमध्ये आदिवासी गौरव वर्षे (JJGV)अंतर्गत आयोजित केला होता.
या कार्यकमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करुन आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके यांनी केले. याप्रसंगी आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव विभू नायर, आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, मंत्रालयाच्या संचालक दीपाली मासिरकर, बीबीएमसी सेल- आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर विवेक कुमार, तसेच आयआयटी दिल्लीचे एसोसिएट प्रोफेसर संदीप कुमार आदी उपस्थित होते. तसेच सर्व राज्यातील जमाती संशोधन संस्था (TRIs) आणि जमाती भाषांचे तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
हा अत्यंत काटकसरीने केलेला नवा उपक्रम असून जो अन्य व्यापारी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत दहा पट कमी खर्चात तयार केलेला असल्याचे आदिवासी कार्य मंत्रालयाचे सचिव विभू नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की या योजनेत अत्याधुनिक तंत्राला राज्य TRIs द्वारा एकत्रित वास्तविक भाषा डेटासोबत जोडलेले आहे. यात फिडबॅक सिस्टीमचा देखील समावेश आहे. त्यामुळे सामुदायिक भागीदारीतून यात आणखी सुधारणा करणे शक्य होणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
हिंदी, इंग्रजी आणि आदिवासी भाषा दरम्यान रीअल-टाईम टेक्स्ट आणि स्पीच भाषांतर करणे शक्य
विद्यार्थी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी इंटरएक्टीव भाषा शिक्षण मॉड्यूल
लोककथा, मौखिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटलीकरण
आरोग्य सल्ला आणि पंतप्रधान यांची भाषण सारख्या सरकारी संदेशाचे सबटायटल आदिवासी भाषेत दिसणार
वेब पोर्टल (https://adivaani.tribal.gov.in ) वर ‘आदि वाणी’ चे बीटा संस्करण उपलब्ध आहे. आणि या ऐपचे बीटा संस्करण लवकरच प्ले स्टोर आणि iOS वर देखील उपलब्ध होणार आहे. सध्या संताली (ओडिशा), भीली (मध्य प्रदेश), मुंडारी (झारखंड) आणि गोंडी (छत्तीसगड ) या भाषांचे भाषांतर करते. त्यानंतर लवकरच कुई आणि गारो भाषांची भाषांतराची सोय होणार आहे.