गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिका सज्ज
मुंबई, दि १
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अनंत चतुर्दशी दिनी अर्थात शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) याठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने विविध स्तरीय व्यवस्था करण्यात येते. याबाबत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वृत्तसंकलन करणे अधिक सुविधाजनक व्हावे, याकरिता स्वतंत्र मंडप उभारण्यात येतो. या मंडपात प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र बंधनकारक असते.

वरीलनुसार आपल्या प्रसारमाध्यम संस्थेच्या प्रतिनिधींना प्रवेशपत्र हवे असल्यास, कृपया प्रतिनिधींनी बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत खालील कागदपत्रांची पूर्तता करून जनसंपर्क विभागात पोहच करणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी, ही विनंती.
गुरूवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे दिनांक ३ सप्टेंबर २०२५ नंतर कागदपत्रे स्विकारण्यात येणार नाहीत, याचीही कृपया नोंद घ्यावी.

प्रवेशपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१. पासपोर्ट आकाराची २ छायाचित्रे
२. संपादकांच्या शिफारशीचे पत्र (नाव आणि पदनामाच्या उल्लेखासह)
३. आधारकार्डची स्व-साक्षांकित छायाप्रत
४. प्रसारमाध्यम संस्थेच्या ओळखपत्राची स्व- साक्षांकित छायाप्रत
*अर्ज स्विकारण्याची मुदत – बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
प्रवेशपत्र वितरण – ४ सप्टेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत)
समन्वयासाठी संपर्क
श्री. गणेश पुराणिक, उप जनसंपर्क अधिकारी – ८८७९३९९९३६
श्री. धनाजी सुर्वे, सहायक जनसंपर्क अधिकारी – ९९७०७३३६९८
KK/ML/MS