मुंबईतील कष्टकऱ्यांच्या कार्याला गणेश देखाव्यातून सलाम!

 मुंबईतील कष्टकऱ्यांच्या कार्याला गणेश देखाव्यातून सलाम!

ठाणे दि. १:– मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली. त्यामागे मराठमोळ्या कष्टकरी जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे, यासाठी अंबरनाथच्या उमेश नाडकर यांनी आपल्या घरच्या गणपती देखाव्यातून मराठमोळी मुंबई हुबेहूब साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.
 
मुंबईतील कष्टकरी जनतेच्या योगदानामुळेच मुंबई विकासाच केंद्र म्हणून नावारुपाला आली आहे. मुंबईतील जनतेने मराठमोळी संस्कृती जपून ठेवण्याच काम केले आहे. हीच आठवण कायम राहावी यासाठी उमेश नाडकर यांनी हा देखावा तयार केला आहे. मागील महिनाभर मुंबईचा हा देखावा साकारण्यासाठी उमेश नाडकर व त्यांचे कुटुंबीय मेहनत घेत होते. या देखाव्यासाठी प्रत्येक वस्तू ही इकोफ्रेंडली असून घरातील टाकाऊ वस्तू त्यांनी देखाव्यात उपयोगात आणल्या आहेत.
 
मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे उपनगरी गाडी, पूल, कोळीवाडा, बीडीडी चाळ, भाजी वाला, सफाई कामगार, बूट पॉलिश वाला, बँडस्टँड, हमाल, धोबीघाट, मेट्रो चे सुरु असलेले काम, पेपर स्टॉल आदी मुंबईतील विविध गोष्टी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न या गणेश देखाव्यात करण्यात आला आहे. या देखाव्यासाठी उमेश नाडकर यांच्या सोबत स्वप्नाली राजे, स्मिता राजे, अजित मोडक यांनी या सजावटीत आपले योगदान दिले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *