आझाद मैदान सुलभ शौचालयाच्या मालकाची आंदोलनकर्त्यांकडे पैशाची मागणी
आंदोलनकर्ते संतापले

मुंबई, दि 2९
मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते आझाद मैदान परिसरात दाखल झालेले असताना, मूलभूत सुविधा न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानाजवळील सुलभ शौचालयात आंदोलनकर्त्यांकडून बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचे चित्र दिसत होते.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभ शौचालयाचा मालक गुप्ता नावाचा व्यक्ती आंदोलनकर्त्यांना “पैसे दिल्याशिवाय शौचालय वापरू देता येणार नाही” असा दादागिरीचा पवित्रा घेत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातून आलेल्या आंदोलनकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
“सार्वजनिक शौचालय हे शासनाच्या नियंत्रणाखाली असून, आपत्कालीन परिस्थितीत मोफत उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र गुप्ता नावाच्या मालकाकडून पैशासाठी आंदोलनकर्त्यांना अडवले जात आहे. लघुशंका करण्यासाठी आणि शौचालय वापरण्यासाठी पैसे घेणे ही ही आंदोलनकर्त्यांची सरळसरळ लूट आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. तर काही आंदोलनकर्त्यांची मालकासोबत बाचाबाची होऊन प्रकरण मारहाणी पर्यंत देखील पोहोचले होते.KK/ML/MS