तब्बल 30 लाख रुपयांचा TV भारतात लॉन्च

 तब्बल 30 लाख रुपयांचा TV भारतात लॉन्च

मुंबई, दि. २९ : Hisense कंपनीने भारतात त्यांची नवीन UX ULED RGB Mini-LED TV सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज 100 इंच आणि 116 इंच अशा दोन मोठ्या स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहे. यातील सर्वात महागड्या 116 इंचाच्या मॉडेलची किंमत 29,99,999 रुपये आहे. या सर्वात महागड्या टीव्हीच्या किमतीत तुम्ही दोन महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही (SUV) खरेदी करू शकता. तर, 100 इंचाच्या मॉडेलची किंमत 9,99,999 रुपये आहे.

गेमिंगसाठी, टीव्हीमध्ये 165Hz गेम मोड अल्ट्रा, एएमडी फ्रीसिंक प्रीमियम प्रो (AMD Free Sync Premium Pro) आणि व्हीआरआर (VRR) सारखी फीचर्स आहेत. Hisense UX सिरीज कंपनीच्या VIDAA Smart OS वर चालते. हे 28 भाषांना सपोर्ट करते, ज्यात हिंदीचा देखील समावेश आहे. कंपनी 8 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देणार आहे आहे

या टीव्हीमध्ये RGB Mini-LED तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सामान्य मिनी-एलईडी टीव्हीच्या तुलनेत, हे तंत्रज्ञान हजारो डिमिंग झोन्समध्ये स्वतंत्र लाल, हिरवे आणि निळे एलईडी वापरते.

कंपनीच्या दाव्यानुसार, यामुळे 95% BT.2020 कलर कव्हरेज आणि 8,000 निट्सपर्यंतची ब्राइटनेस मिळते. यात HDR10+, डॉल्बी व्हिजन IQ आणि IMAX Enhanced सर्टिफिकेशनसाठी देखील सपोर्ट आहे.

या टीव्हीमध्ये Hi-View AI Engine X प्रोसेसर आहे, जो पिक्चर, आवाज आणि वीज वापर रिअल टाइममध्ये समायोजित करतो. या सिस्टीममधील H7 पिक्चर क्वालिटी प्रोसेसरला 2-TOPS NPU चा सपोर्ट आहे, ज्यामुळे चित्र अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट दिसते.

यात 3D कलर मास्टर प्रो (3D Colour Master PRO) देखील आहे, जो रंगांची अचूकता सुनिश्चित करतो. तसेच, यात स्मूथ प्लेबॅकसाठी MEMC (मोशन एस्टिमेशन आणि मोशन कंपनसेशन) तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *