आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांचा संताप

मुंबई, दि २९
आंदोलनकर्त्यांना जेवण करायला पाणी नसल्याने जेवण करायला अडचण येत आहे. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेकडून आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही गावावरून शिधा आणला आहे. जेवण शिजवण्यासाठी भाजी, धान्य, इंधन सर्व काही आहे. मात्र पाणी नसल्यामुळे आम्ही जेवणही करू शकत नाही. इतक्या मोठ्या महानगरपालिकेकडे जर आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी पुरवण्याची सोय नसेल, तर ही महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसारख्या शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे.”
आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि पालिकेवर थेट निशाणा साधत सांगितले की, “पाणी पुरवठा करणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. आम्ही आंदोलनासाठी हजारो किलोमीटरवरून आलो आहोत. आरक्षणाच्या मागणीबरोबरच आता आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी देखील लढावे लागणार आहे का?”KK/ML/MS