दमदार पावसामुळे ईरई धरणाची सर्व 7 दारे उघडली
चंद्रपूर दि २८:– दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडण्यात आली आहेत. चंद्रपूर शहर- जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन गणेशोत्सवात या पावसाने गणेश भक्तांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. ईरई धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणाची चार दारे अर्ध्या मीटरने तर दोन दारे पाव मीटरने उघडली आहेत. धरणातून नदीत 7626 क्यूसेक्स एवढा प्रवाह सोडला जातोय. ईरई काठच्या गावे व शहरांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याही शहर जिल्ह्यात वातावरण ढगाळलेले असून आणखी पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 81.7% एवढा पाऊस पडला आहे. ML/ML/MS