मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला…
नाशिक दि २८– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून काल रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या विविध मराठा संघटनांनी मुंबईकडे जाण्यासाठी जय तयारी केली असून नाशिकच्या कालिका माता मंदिर परिसरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उद्या सकाळी ७ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसने आज मुंबईकडे रवाना झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे.ML/ML/MS