*वसई व जळगांव मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

 *वसई व जळगांव मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

मुंबई, दि २६
शरद पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच वसई येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह ‘बविआ’च्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा दुबे पंडीत, आ. राजेश वानखेडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव अपर्णा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये अनेक शीख बांधवांचा समावेश आहे. बविआ विभाग प्रमुख राजू इस्साई, रविंदर सिंह आनंद, काँग्रेसचे करणदीप सिंह अरोरा, गुरजीत सिंह छाबरा, गुरमीत सिंह छाबरा, चरणजित सिंह सभरवाल नरेंद्रपाल सिंह माखिजा, गुरजिंद सिंह चावला, सुकदेव सिंह, भूपिंदर सिंह हंसपाल, मनजीत लांबा, दिलबाग सिंग आणि हवाई दलातील निवृत्त अधिकारी सुखदेव सिंह बाथ आदींचा समावेश आहे.
जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या चोपडा पंचायत समिती माजी सभापती भरत पाटील, गोपाल महाजन, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, अनिल महाजन आदींनी तसेच आदिवासी भिल्ल समाजातील राहुल दळवी, काशिनाथ दळवी, आकाश दळवी, अंकुश दळवी, संदीप दळवी आदी असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *