वरळी येथे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

मुंबई, दि २६
आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळीतील जांबोरी मैदान येथे नवव्या वर्षी गणपती विसर्जनासाठी ७ कृत्रिम तलावांचे भूमिपूजन करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आणि मुंबई महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या वतीने कृत्रिम तलावांचे काम केले जाणार आहे. वरळी विभागातील घरगुती आणि सार्वजनिक गणपती यांना विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध व्हावे. जेणेकरून विसर्जनावेळी गर्दी होऊ नये आणि विसर्जन सुरळीत पार पडावे या उद्देशाने आम्ही आम्ही या कृत्रिम तलावाचे दरवर्षी आयोजन करत असल्याची माहिती वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
भूमिपूजनप्रसंगी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, सतीश आंबोडे मुंबई विकास विभाग चाळी व्यवस्थापक, महिला विधानसभा प्रमुख अनुपमा परब, शाखा संघटिका अनिता नायर, सुजाता सावंत आणि निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.KK/ML/MS