तेल कंपन्यांच्या नफ्यात विक्रमी वाढ, खासगी क्षेत्राचीही लक्षणीय प्रगती
नवी दिल्ली, दि. २२ : अमेरिकेच्या टेरिफ दबावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणावाची स्थिती असतानाही भारताने या महिन्यात लक्षणिय प्रगती केली आहे. त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) चा Q1FY26 (एप्रिल-जून 2025) नफा ₹5689 कोटी आहे, जो मागच्या वर्षी याच तिमाहीत ₹2643 कोटी होता, भारत पेट्रोलियम (BPCL) चा Q1FY26 चा नफा ₹6124 कोटी आहे जो मागच्या वर्षी याच तिमाहीत ₹3015 कोटी होता आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) चा Q1FY26 चा नफा ₹4371 कोटी आहे जो मागच्या वर्षी याच तिमाहीत ₹356 कोटी होता. या तीन सरकारी कंपन्यांचा एप्रिल-जून 2025 मधील एकत्र नफा ₹16184 कोटी झाला आहे जो मागच्या वर्षी एप्रिल-जून 2024 च्या तिमाहीत ₹6014 कोटी होता!
- सेवाक्षेत्र PMI : 65.6
(आजवरचा सर्वोच्च स्तर) - उत्पादन क्षेत्र PMI : 59.8
(2008 नंतरचा सर्वोच्च स्तर)
सोप्या भाषेत समजावून घेऊया : PMI म्हणजे Purchasing Managers’ Index, अर्थात कंपन्यांचे कामकाज किती वाढते किंवा कमी होते हे दाखवणारा निर्देशांक. 50 पेक्षा जास्त = वाढ. 50 पेक्षा कमी = मंदी.
मग, ऑगस्टमध्ये काय झाले?
सेवाक्षेत्र PMI : 65.6
अर्थात बँका, IT कंपन्या, हॉटेल्स, एअरलाईन्स आणि इतर सेवाक्षेत्रात वाढ.
उत्पादन क्षेत्र PMI : 59.8
अर्थात, गेल्या 16 वर्षांतील सर्वोच्च वाढ! कारखाने जोरात उत्पादन करत आहेत.
(आज 21 ऑगस्ट आहे. ऑगस्ट महिन्याचा अंतिम PMI डेटा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केला जाणार आहे. त्यावेळी ही आकडेवारी अजून चांगली असणार आहे).
भारतातील खाजगी क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. दोन्ही क्षेत्रात नोकऱ्या, ऑर्डर्स आणि उत्पादन वाढले आहे. ही वाढ जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त वेगाने होत आहे. ‘डेड इकॉनॉमी’ म्हणणारी लोकं देव पाण्यात बुडवून बसली असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जात आहे!!
SL/ML/SL