मोठ्या उत्साहात बैल पोळा सण साजरा, ७० वर्षाची अनोखी परंपरा…

बीड दि २२….बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैल पोळा सण हा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नागदरा येथे बैल पोळा अनोख्या पध्दतीने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. गावात असलेल्या नागेश्वर मंदिर आणि मारुती मंदिराला बैल प्रदक्षिणा घालून ७० वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा जोपासत

आहेत. सर्व जाती धर्माचे शेतकरी या ठिकाणी एकत्र येऊन सर्वांचे बैल मोकळे सोडले जातात. ते बैल मंदिराला पाच पेक्षा अधिक प्रदक्षिणा घालतात त्या नंतर शेतकरी आपापले बैल घेऊन जाऊन त्यांची विधिवत पूजा करता.ML/ML/MS