गणपती विसर्जनपूर्वी वरळी येथील लोटस जेट्टीची केली युवासेनेने पाहणी

मुंबई, दि २१
वरळीतील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जन दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही या संदर्भात शिवसेना उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील यांनी मुंबई महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश यादव, कनिष्ठ अभियंता शिव प्रसाद कोपर्डे यांच्या सोबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक मार्गदर्शक सूचना तसेच नागरिकांच्या सूचना देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आल्या. या सूचनांच्या प्राधान्याने विचार करून लगेच गणपतीच्या विसर्जनापूर्वीच सगळी रखडलेली कामे पूर्ण करून अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने लाईफ गार्ड देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात येतील अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी किनारी रस्ता प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता हृषिकेश पाटील, कनिष्ठ अभियंता गणेश कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे ,वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, ताडदेव पोलीस ठाण्याचे कदम, वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास शिंगरे उपस्थित होते. मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांनी तसेच इतर प्रशासनाने आम्हाला चांगले सहकार्य केले असून या ठिकाणी जे सध्या परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाई करून या व्यक्तीची सुधारणा करण्यात येईल अशी माहिती आम्हाला दिली असून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असल्याची माहिती शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.KK/ML/MS