जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

छ. संभाजी नगर दि २१– जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 95 टक्क्यावर पहोचल्याने आज सकाळी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे, धरणाचे 18 दरवाजे अध्या फुटा पर्यंत उघडण्यात आले आहेत.
एकूण 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे अशी माहिती साह्यक अभियंता मंगेश सेलार यांनी दिली. सकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात असल्याने गोदाकाठच्या गावांनी सर्तक रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.ML/ML/MS