23 ऑगस्ट रोजी अजित पवार, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत रंगणार नाट्य परिषदेचा वर्धापनदिन*

 23 ऑगस्ट रोजी अजित पवार, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत रंगणार नाट्य परिषदेचा वर्धापनदिन*

पुणे, दि २०: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेला ९ ऑगस्ट रोजी २९ वर्षे पूर्ण झाले आहेत. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शाखेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे शाखेच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या मान्यवरांना ‘‘कै. बालगंधर्व’, ‘कै. स्मिता पाटील’, ‘कै. आचार्य अत्रे’, ‘कै. अरुण सरनाईक’, ‘कै. जयंत दळवी’ ई. मान्यवरांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील स्थानिक कलाकार व रंगमंचावरील विविध तंत्रज्ञ यांना विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सुहास जोशी,राजेंद्र बंग,संतोष रासने,संतोष शिंदे,गौरी लोंढे,रुपाली पाथरे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भोईर म्हणाले,नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नेहमीच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून शहराचे सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य करण्यात येते. शाखेने आजतागायत दोन नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. या वर्षीही दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई चे विश्वस्त मा. अशोक हांडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ – श्री ज्ञानेश पेंढारकर (ज्येष्ठ नाट्य संगीतकार)

‘आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार’ – श्री संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता,कवी, लेखक, निवेदक)

‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ – प्रवीण तरडे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक)

‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ – स्पृहा जोशी (कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका)

‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ – अरविंद जगताप (नाट्य-सिने-मालिका लेखक)

याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराचे चे भूषण पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ज्येष्ठ शास्त्रीयय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद, मध्यवर्तीचा‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विशेष पुरस्कार:-
सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप उर्फ जम्माड देशमुख, संदीप उर्फ बबलू जगदाळे, सोमनाथ तरटे.

याशिवाय राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये मनोहर जुवाटकर,कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *