BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट

 BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट

मुंबई,दि. १९ : रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आता एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे जी तुम्हालाही आवडेल. कंपनी मान्सून धमाका ऑफर अंतर्गत मर्यादित काळासाठी वापरकर्त्यांना मोफत ब्रॉडबँड कनेक्शन देत आहे. या ऑफर अंतर्गत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध आहे, या ऑफरचा लाभ घेतला तर कंपनी तुम्हाला इंस्टॉलेशनच्या दिवसापासून एक महिन्यासाठी मोफत सेवा देईल.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेता येईल. याचा अर्थ असा की जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सुमारे १ महिना शिल्लक आहेत कारण 30 सप्टेंबरनंतर या ऑफरचा फायदा मिळणार नाही.

या ऑफर व्यतिरिक्त कंपनीकडे इतर काही उत्तम ऑफर देखील आहेत जसे की कंपनी 449 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यावर तीन महिन्यांसाठी 50 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने 499 रुपयांचा प्लॅन खरेदी केला तर पुढील तीन महिन्यांसाठी 100 रुपयांची सूट दिली जाईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *