चिखली तालुक्यात अतिवृष्टी तर अनेक जलप्रकल्प भरले, विसर्ग सुरू…

बुलडाणा दि १९ — जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची संतत सुरु असल्याने अनेक ओढे ,नद्या ओसंडून वाहत आहेत, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतीवृष्टी झाली असून हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. अनेक रस्ते, पूल यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे .
भारतीय हवामान विभागाने (IMD) बुलडाणा जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेषतः नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये मोठा जलप्रकल्प पेनटाकळी खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.
परिणामी, पेनटाकळी आणि खडकपूर्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी मेहकर तालुक्यातील पेनटाकळी, कोराडी धरण, देऊळगाव साकर्षा येथील विविध जलप्रकल्प आणि पुलाची पाहणी करून जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना या वेळी केल्या. खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून विविध जलप्रकल्प पाण्याने भरले आहेत.
मन प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन आराखड्यानुसार प्रकल्पामध्ये पाण्याचा येवा आणि पाऊस लक्षात घेता धरण सुरक्षेच्या मन प्रकल्पाचे पाच द्वार सर्वप्रथम १०,२०,४०, आणि ७० cm सेंटीमीटर ने उघडून ४८० घनमीटर सेकंद एवढा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदी काठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- पाण्याचा विसर्ग वाढल्याने प्रवाहाचा वेग अत्यंत वेगाने वाढू शकते अश्या सूचना देण्यात आल्या आहेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील तसेच तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात असून जिल्ह्यात आगामी पूरपरिस्थिती च्या अनुषगाने सर्व यंत्रणा ना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही भागात आपत्ती उद्बभवल्यास खालील क्र संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासाठी
महत्त्वाचे संपर्क क्रमांक: - जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष बुलढाणा:
- दूरध्वनी क्रमांक: 07262242400
- मोबाइल क्रमांक: 9422880113
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ML/ML/MS