मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी…

मुंबई दि १८ — मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर रेड अलर्ट देण्यात आलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड , नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सह या सगळ्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरसह या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने सुट्टी जारी करण्यात आली आहे. या शिवाय स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाधिकारी, शाळा मुख्याध्यापक यांना शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. ML/ML/MS