चंद्रपुरात मुसळधार पाऊस,
वर्धा नदी फुगल्याने अनेक मार्ग बंद…

चंद्रपूर दि १८:- चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून अधेमधे पडणारा पाऊस आज सलग येऊ लागल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली. सखल भागात पाणी साचू लागले असून, रस्त्यांवरही पावसाचे पाणी आले आहे. दुसरीकडे, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला. त्यामुळे तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली. परिणामी उलटा दाब निर्माण होऊन इरईचे पाणी चंद्रपूर शहरात घुसू शकते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.ML/ML/MS