परभणी मध्ये पूर परिस्थिती, नदी नाले तुडुंब….

परभणी दि १८ — जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आज जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर अनेक भागांमध्ये पाणी साचले असूनओढे नदी नाले यांना पूर आले आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीत विसर्ग २१ हजार क्युसेक्सने सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून पुर्णा नदीत विसर्ग होत आहे तर निम्न दुधाच्या प्रकल्पाचे ही २ दोन दरवाजे उघडण्यात आले असून दुधना नदीतून पूर्णा नदीत असा ३ धरणातून पुर्णा नदीत विसर्ग वाढल्याने पूर आला आहे तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहेत.
येलदरी धरणाच्या विसर्गामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने जिंतूर सेनगाव असा हिंगोली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. पूर्णा तालुक्यातील वडगाव आणि आहेरवाडी गावांना पाण्याचा वेढा घातला असून दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे .तर पूर्णा झिरीफाटा मार्गावरील माटेगाव पर्यायी पुलावरून ३ दिवसांपासून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहे.
पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने पुयणी येथील पूल वाहून गेल्याने १२ गावांचा काल पासून संपर्क तुटला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे , गंगाखेड SDM जीवराज डापकर यांच्यासह महसूल अधिकारी आणि कृषी अधिकारी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरग्रस्त भागातील पाहणी करत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग ही कार्यरत आहे.ML/ML/MS