रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार नद्यांच्या पातळीत वाढ; पुराचा धोका कायम…

रत्नागिरी दि १७:– रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यात नारंगी आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, त्यामुळे अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
खेड-बहिरावली रस्त्याजवळील सुसेरी येथे नारंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने खाडीपट्टा विभागातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन बोरज धरणातून पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेड-आष्टी रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेला असून आष्टीचा खेड शहराशी संपर्क तुटला आहे. सध्या प्रशासन अलर्ट मोड वरती असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ML/ML/MS