जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब…

जालना दि १७ — जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील नजीक पांगरी, भारडखेडा, केळीगव्हाण परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून दुथडी भरून वाहू लागले आहेत.
बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील नजीक पांगरी, भारडखेडा, केळीगव्हाण यांसह परिसरातील गावांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी – नाले ओसंडून वाहत असून नजीक पांगरी परिसरातून वाहणाऱ्या एका नाल्याला ही पाणी आले आहे. ML/ML/MS