दूधगंगा धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस, सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर दि १७ — दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलगपणे सुरु असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता आज सकाळी 11.00 वाजता विद्युत निर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये वाढ होणारआहे.
पावसाचं प्रमाण, पाण्याची आवक यांस अनुसरून आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
म्हणून नदीकाठावरील सर्व गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांनी, नदीपात्रामध्ये कोणत्याही कारणासाठी उतरू नये. नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावीत यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी म्हणून दक्षतेचा कोल्हापूर पाटबंधारे विभागानं इशारा दिला आहे.ML/ML/MS