वर्धा नदीला पूर, भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली …

 वर्धा नदीला पूर, भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली …

चंद्रपूर दि १७:– चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून गडचांदूर मार्गावरील भोयेगाव पुलावरून यंदा दुसऱ्यांदा पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचांदूर-चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसाने वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *