धारशिवमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती, एकाचा मृत्यू…

धाराशिव दि १७ — जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा तेरणा आणि वासेरा या तिन्ही नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक गाव प्रभावित झाले आहेत तालुक्यातील 24 गावातील शेती पिकांचं आणि नदीकाठच्या घरांचं नुकसान झालं आहे अशी माहिती तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिले आहे.
दरम्यान या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या खोदला गावच्या शुभ्राव शंकर लांडगे यांचा मृतदेह शोधण्याचं काम आणखी देखील सुरूच आहे, त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफ 15 ऑगस्ट आणि 16 गोष्ट या दोन दिवस हे शोध कार्य हाती घेऊनही त्यांचा मृतदेह सापडला नाही. आता स्थानिक नागरिकांच्या मदतीने महसूल प्रशासन या मृत व्यक्तीचा शोध घेत आहे, अशी माहिती ही तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिली आहे. ML/ML/MS