मोठ्या प्रतिक्षेनंतर धुळ्यात जोरदार पाऊस….

धुळे दि १७– अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळ्यात काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. निम्मा ऑगस्ट महिना उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते, मात्र आजच्या पावसामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामध्ये जिल्हा रुग्णालय परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि इतर शासकीय आस्थापनांच्या आवारांत पाणी जमा झाले. तसेच चाळीसगाव रोड क्रॉसिंग परिसरही पाणी साचल्यामुळे जलमग्न झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला झाला. ML/ML/MS