शिवना टाकळी धरणाचे तीन दरवाजे उघडले, नदीला मोठा पूर …

छ. संभाजीनगर दि १६ : जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवना टाकळी धरण 93.49 टक्के भरले आहे. त्यामुळं धरणाचे तीन दरवाजे 20 इंचानी उघडण्यात आले आहे. तीन दरवाजे 2280 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर लासुर स्टेशन येथे शिवना नदीला मोठा पूर आला असून काही गावाचा संपर्क देखील तुटला आहे.