स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!

मुंबई, दि १६ : भांडुप येथील समजसेविका व युवा सेना सदस्य राजोल संजय पाटील यांनी
काल भारताचा ७९ स्वातंत्र्यदिवस भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग व ईशान्य मुंबईच्या इतर मतदार क्षेत्रात साजरा केला.

याप्रसंगी आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या विविध कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या
तसेच भांडुपच्या साई हिल सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरास उपस्थित राहून रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

राजोल संजय पाटील यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या

स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन! ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या !🇮🇳 ML/ML/MS