भिमसैनिकांडून स्मारकाच्या नियोजित जागेवर बाबासाहेबांच्या नावाची कमान

 भिमसैनिकांडून स्मारकाच्या नियोजित जागेवर बाबासाहेबांच्या नावाची कमान

पुणे, दि १४: मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री बहाद्दर भीमसैनिकांनी जागेच्या गेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असा फलक लावला आहे. हा फलक लावल्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये चैतन्य उसळले असून उद्याचे आंदोलन अधिक व्यापक व शांततेत होण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पुणे व पश्चिम महाराष्ट्रात नसल्याची खंत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक वर्ष खदखद आहे. त्या पार्श्वभूमीवर केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी उभे व्हावे या उद्देशाने या स्मारकाची मागणी करण्यात येत आहे.

उद्याच्या आंदोलनामध्ये किमान 50 हजार भीमसैनिक स्त्री-पुरुष सहभागी होतील असा विश्वास आंदोलकांच्या आयोजकांना असून त्या दृष्टिकोनातून सर्व नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता भयमुक्तपणे या वातावरणात सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात येत आहे.

आंदोलनाची सुरुवात भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीता द्वारे करण्यात येणार आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *