मिरा-भाईंदर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शासनाची जमीन मंजूर

मिरा-भाईंदर दि १४:– मिरा – भाईंदर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना व इतर वाहतूक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मोजे उत्तन, ता. ठाणे, सर्वे क्र. २०३/३ येथील ०.४७० हेक्टर सरकारी जमीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub RTO Office) उभारण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत मंजूर करण्यात आली आहे.
ही मंजुरी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मिळाली असून संबंधित जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. या कार्यालयामुळे मिरा-भाईंदर व आसपासच्या भागातील वाहनधारक, व्यापारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहन नोंदणी, परवाना, वाहन तपासणी व इतर सेवा आता स्थानिक स्तरावर मिळणार असून वाहतूक व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा होणार आहे.ML/ML/MS