अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया यशस्वीपूर्ण, दर्शन सुरू….

कोल्हापूर दि १४–
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया गेल्या तीन दिवसात यशस्वीपणे पार पडली. आज सकाळी साडेआठ वाजता मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी सुरू झाले. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्तीची संवर्धानासाठी पाहणी करण्याची मागणी केली होती. भारतीय पुरातत्व विभागाचा चमू गेल्या सोमवारी रात्री कोल्हापूरात दाखल झाला होता. गेली तीन दिवस या चमूने मूर्ती संवर्धन प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली. आज सकाळी साडेआठ वाजता मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी विधिवत पूजापाठ होऊन सुरू झाल्याचे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.ML/ML/MS