राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांच्या टूरला जल्लोषात रवाना

मुंबई, दि १३ : स्वातंत्र्य दिनानिमित्त वरळीतील राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांसाठी युवासेना सदस्य सिद्धेश स शिंदे यांच्या विशेष सहकार्याने‘बॉर्डर स्टडी टूर’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय जवानांचे शौर्य आणि भारतीय सीमारेषांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.तसेच भारतीय जवानांचे कार्य कसे होते ते कशा पद्धतीने देशसेवा करतात हा सगळा अनुभव त्यांना अनुभवायला मिळणार आहे. या टूरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा शुभारंभ आज सकाळी ७.०० वाजता भारतमाता, लालबाग येथून करण्यात आला. यावेळी सिद्धेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सिद्धेश शिंदे यांचे आभार मानले. या प्रसंगी उपक्रमाचे संयोजक संतोष परब व त्यांचे सहकारी उपस्थित होते.KK/ML/MS