अटक करुन दाखवा – व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्रम्पना आव्हान

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी इनामात दुप्पटीने वाढ केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांना अटक करण्याची माहिती देणाऱ्यास 50 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 438 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याला प्रत्युतर देत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अटक करण्याचे आव्हान दिले आहे. काल एका भाषणात मादुरो म्हणाले- “या आणि मला अटक करा, मी इथेच मिराफ्लोरेस (राष्ट्रपती राजवाडा) मध्ये तुमची वाट पाहतोय. भेकड लोकांनी, उशीर करू नये.”
राजधानी कराकसमध्ये राजकीय नेते आणि लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत, निकोलस मादुरो यांनी अमेरिकेला असे करू नये असा इशारा दिला. त्यांनी अमेरिकन नेत्यांना सांगितले की असे करण्याचा प्रयत्नही करू नका कारण नंतर त्यांना असा प्रतिसाद मिळेल ज्यामुळे अमेरिकन साम्राज्याचाही अंत होऊ शकतो.
ट्रम्प प्रशासनाचा आरोप आहे की मादुरो हे ड्रग्ज तस्कर आणि तो फेंटानिलने भरलेला कोकेन अमेरिकेत पाठवण्यासाठी ड्रग्ज कार्टेलसोबत काम करत आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मादुरोकडे ७ टन कोकेन आहे जे अमेरिकेत पाठवण्याची तयारी करत आहे.
मादुरोंना जगातील सर्वात मोठ ड्रग्स तस्कर मानण्यात आले आहे. त्यांनी अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये लावलेल्या आरोपांनंतर आता हे इनाम दुप्पट करण्यात आले आहे. ऍटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली मादुरो न्यायापासून वाचू शकणार नाहीत आणि त्यांना त्यांच्या अपराधांची शिक्षा मिळेल.’