दादर कबुतरखान्या विरोधात स्थानिक आक्रमक, उद्या करणार आंदोलन

 दादर कबुतरखान्या विरोधात स्थानिक आक्रमक, उद्या करणार आंदोलन

मुंबई, दि. १२ : कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी उद्या (१३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत? असा सवाल करत सरकारला घेरणार आहेत. स्थानिकांच्या भूमिकेला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे.

दादर येथील कबुतरखाना बंद केल्याप्रकरणी प्रथमच शांतताप्रिय असलेला जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनात जैन समाजातील पुरुषांसमवेत महिलाही सहभागी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील स्थानिक मराठी नागरिकांना तसेच वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. या प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी दाखल होऊन निवेदन सादर करणार आहेत. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत? असा जाब सरकारला विचारणार आहेत.

दरम्यान, स्थानिकांच्या या मागणीला मराठी एकीकरण समितीने देखील पाठिंबा दिला असून १३ तारखेला मराठी एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते याठिकाणी दाखल होणार आहेत. कायदा मोडणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई न झाल्यास दादरमधील कबुतरत्रस्त नागरिक आंदोलन करतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *