दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू

मुंबई, दि. १२ : न्यायालयाच्या आदेशाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदी येऊनही दादर परिसरात अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले असताना हा अनधिकृत कबुतरखाना सुरू करण्यात आलाय. स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. तरीही कोणत्याही पद्धतीनं या कबुतरांना खाणे दिले जात आहेत.
ज्या इमारतीच्या छतावर कबुतरांना दाणे टाकण्यात येतात त्याच्या आजुबाजूला दादर कबुतरखाना, गोल मंदिर परिसर, जैन देरासर येथे जैन समुदाय मोठ्या संख्येने राहतो. जैन समुदायाच्या नागरिकांनी हा अनाधिकृत कबुतरखाना सुरू केला आहे. जैनसमुदायाच्या मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या इमारतीच्या छतावर हा कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या संख्येने जैन बांधव राहतात. कोर्टाच्या नियमांना डावलून अनाधिकृतपणे दाणे कबुतरांना टाकण्यात येते, त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देरासरला लागूनच ही इमारत असल्याने आजूबाजूचा परिसर अतिशय गजबजलेला आहे.
दादरमध्ये कबुतरखाना बंद करण्यावरुन मोठा वाद सुरू आहे. मागच्या आठवड्यात कबुतरखान्यावर लावलेल्या ताडपत्रीमुळे लोक संतप्त झाले आणि त्यांनी ताडपत्री फाडून काढल्या, आंदोलन केले होते. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कबुतरखान्यावरील बंदी कायम राहिली. त्यानंतर जैन समुदायाने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान आता दादर परिसरातील इमारतीच्या छतावर अनाधिकृतपणे रोज दाणे टाकण्यात येत आहे.हजारोंच्या संख्येने कबुतर हे दाणे खाण्यासाठी येतात.
SL/ML/SL