न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग

 न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग

नवी दिल्ली,दि. १२ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा विरोधात सादर करण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाला आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर एकूण 146 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते दोघेही सहभागी आहेत. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महाभियोग प्रस्ताव आणता येतो.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गठीत केलेल्या चौकशी समितीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील प्रत्येकी एक सदस्य तसेच एका कायदेतज्ज्ञाचा समावेश करण्यात आला आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत महाभियोग प्रस्ताव प्रलंबित राहणार आहे. या समितीत समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी. बी. आचार्य, आणि मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

महाभियोगाचे कारण

14 मार्च 2025 रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागली होती. तेव्हा ते दिल्ली उच्च न्यायालयात होते. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, परंतु त्यानंतर एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. न्यायमूर्ती वर्मा यांच्या स्टोअर रूममध्ये प्रत्येकी 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले, जे एका पोत्यात ठेवण्यात आले होते. यानंतर मोठा गदारोळ निर्माण होऊन न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *