आपली संस्कृती जोपासली पाहिजे
समाजसेवक सुनील वाघे

मुंबई, दि ११
माझगाव आणि मुंबई हे एक समीकरण आहे. मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली तरच मराठी संस्कृती देखील टिकेल असे जाहीर प्रतिपादन समाजसेवक सुनील वाघे यांनी माजगाव येथील साईनाथ गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यामध्ये केले. ते पुढे म्हणाले आम्ही चांगले कार्य करण्याचे नेहमीच प्रयत्न करत असतो. समाजात एकोपा आणि एकात्मता टिकवणे हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. त्याच दृष्टिकोनातून आम्ही समाजसेवा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. साईनाथ गोविंदा पथक हे फार जुने गोविंदा पथक असून ते विविध सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे राहते. यावेळी पथकाच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले.. याप्रसंगी पथकाचे पदाधिकारी प्रशांत आडारकर, सुनील वाघे, सुमित चौधरी, करून बांदेकर, संजय कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS