मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी रिपब्लिकन पक्षाची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई, दि ११
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सांताक्रुझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली असून या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हा तालुका वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाची सदस्यता मोहिमेचा आढावा सुद्धा या बैठकीत घेण्यात येणार आहे.तसेच येत्या दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे आयोजित करण्यात आला असून त्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत या बैठकीत महत्वपूर्ण मार्गदर्शन न.रामदास आठवले करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश ची ही बैठक आयोजित करण्यात आली असून रिपब्लिकन पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या महत्वपूर्ण बैठकीस मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; सरचिटणीस विवेक पवार खजिनदार सुनील बन्सी मोरे ; महिला आघाडी मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू; युवक आघाडी अध्यक्ष सचिनभाई मोहिते यांनी केले आहे.KK/ML/MS