ठाण्यात शिवसेना (ठाकरे गट) कडून ‘जनआक्रोश’ आंदोलन

 ठाण्यात शिवसेना (ठाकरे गट) कडून ‘जनआक्रोश’ आंदोलन

ठाणे, दि ११

महाराष्ट्रातील राजसरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना (ठाकरे गट) तर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते नरेश मनेरा, केदार दिघे तसेच ठाणे जिल्ह्यातील उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार, जनहितविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना मंत्री योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारच्या भ्रष्ट धोरणांविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आले, ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला. ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले.

राजन विचारे यांनी भाषणातून जनतेला आवाहन केले की, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा द्यावा. या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला. AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *