औषधांसोबत मिळाला स्नेहाचा धागा…

ठाणे, दि ९
ठाणे “रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो,”
महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा आणि हृदयाला स्पर्श करणारा सोहळा रंगला. विविध वॉर्डांमधील रुग्णांना महिला डॉक्टर आणि नर्सांनी राखी बांधली. घरापासून आणि कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांसाठी हा क्षण जणू भावनिक औषध ठरला.
रुग्णालयाच्या वातावरणात या दिवशी केवळ औषधांचा गंध नव्हता, तर स्नेह, माया आणि मानवी नात्यांचा सुगंधही पसरला होता. महिला कर्मचाऱ्यांनी चॉकलेट, मिठाई वाटून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. काही रुग्णांनी आशीर्वाद दिले,
हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, रुग्ण आणि आरोग्यसेवक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरला. आजारपणाच्या लढाईत औषधांइतकाच भावनिक आधारही महत्त्वाचा असतो, हे या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. अर्चना पवार, डॉ.ज्ञानेश्वर
सलगर आदी आणि कर्मचारी उपस्थित होते. AG/ML/MS