यवतमाळ जिल्ह्यात सात प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये २१ टक्के पाणी….

यवतमाळ दि ९ — यवतमाळ जिल्ह्यात मोठे, मध्यम , लघू असे ७५ प्रकल्प आहेत.
या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागविल्या जाते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी शेतकऱ्यांसाठी सोडले जाते.
यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नदी-नाले ओसंडून वाहली होती. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारसी पाणीटंचाई जाणवली नाही. अपवाद काही तालुक्यांतील गावांना टँकर्सने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शिवाय काही विहिरींचे अधिग्रहण करण्यातत आले होते. मात्र, शहरांना पाणीटंचाईचा फटका बसला नाही. जिल्ह्यात पुस, बेंबळा आणि अरुणावती असे तीन मोठे प्रकल्प आहेत. एकूण सात मध्यम प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के इतकेच पाणी आहे. ML/ML/MS