माझगावकरांनी आपली संस्कृती जोपासली त्याचा मला अभिमान

मुंबई, दि ८
माझगाव हे संस्कृतीचा माहेरघर असून माजगावकरांनी आपली संस्कृती आज जोपासली आणि नारळ फोडण्याचा हा पारंपारिक कार्यक्रम घेतला त्याचा मला फार अभिमान वाटतो असे जाहीर प्रतिपादन माजी आमदार यामिनी जाधव यांनी माजगाव येथील भाई बांदल चौक येथे आयोजित केलेल्या नारळ फोडणे स्पर्धेमध्ये केले. त्यापुढे म्हणाल्या दक्षिण मुंबईतील माजगाव आणि ही मुंबई मराठी संस्कृतीचे माहेर घर असून या ठिकाणी आपली संस्कृती जोपासली जाते. श्रावण सुरू झाला असून राखी पौर्णिमेच्या माध्यमातून समुद्रामध्ये नारळ टाकून पोळी बांधव त्यांची नारळी पौर्णिमा जल्लोष साजरी करतात. आता गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्याची देखील तयारी दक्षिण मुंबईत लागू झाली मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. आयोजक सुनील वाघे आणि प्रशांत आडारकर यांनी या ठिकाणी नारळ फोडणे स्पर्धा घेतली आणि त्यात महिलांनी हीरो हीरोइन ने भाग घेऊन नारळ फोडले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
आम्ही दरवर्षी नाना फोडणी स्पर्धा आयोजित करत असतो. आपली मराठमोळी संस्कृती टिकावी आणि जोपासावी हा दृष्टिकोन मनात बाळगून आम्ही यावर्षी देखील नारळ फोडणे स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक सुनील वाघे यांनी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालक जगदीश नलावडे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमात सौ अश्विनी ताई खटावकर, सौ स्मिता यादव, भायखळा विधान सभा संघटक विजय दाऊ लीपारे, संतोष राणे, राकेश खानवीलकर, गणेश पाटील, दत्ता जाधव, अमीत पाटील आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. KK/ML/MS