आवक वाढल्याच्या कारणाने मिरचीचे भाव 100 वरून थेट 30 रुपयांवर…

जालना दि ८:– जालन्याच्या वालसावंगी परिसरात मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मिरचीचे दर 100 रुपयांवरून थेट 30 रुपयांवर आले आहेत. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड झाल्याने उत्पादनही भरपूर झालं आहे. शेतकऱ्यांना येथे तयार झालेली मिरची तोडून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते.मात्र,या बाजारात मिरचीची आवक अचानक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. मिरचीचे भाव 100 रुपये किलोवरून आता थेट 30 रुपये किलोवर घसरले आहेत. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ML/ML/MS