‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून सन्मान

नवी दिल्ली, दि. ६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात या उपक्रमाने 3.53 कोटींहून अधिक नोंदणी आणि टेलिव्हिजनवर 21 कोटींहून अधिक प्रेक्षक मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
2018 पासून केंद्रीय शिक्षण मंत्रालय MyGov च्या सहकार्याने परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करत आहे. हे पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतले एक अद्वितीय जागतिक व्यासपीठ आहे. या ठिकाणी ते विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधतात. पंतप्रधानांचा हा उपक्रम परीक्षेच्या काळात सकारात्मकता निर्माण करतो. तसेच अभ्यासाची तयारी करण्यासाठी प्रेरित करतो. यामुळे परीक्षेतील ताणतणाव कमी होतो.
SL/ML/SL