धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मुलुंड मध्ये विरोध

 धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मुलुंड मध्ये विरोध

मुंबई, दि. २– धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतिने मुलुंड पुर्व येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याला मुलुंडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना फळांचा रस देऊन उपोषण सोडायला सांगितले.

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड, भांडुप, कांजुर व विक्रोळी या ठिकाणी करण्यात येणार आहे. मात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये. यासाठी मुलुंडकरांनी विविध आंदोलन करुन आपला विरोध दर्शविला आहे. मात्र राज्य सरकार स्थानिक नागरीकांच्या मागणीला जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुलुंडकरांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात एकही रहिवासी मुलुंडमध्ये स्थलांतरित करण्यात येणार नाही. असे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र निवडणुका झाल्यानंतर भाजपाने आपल्या आश्वासनाची पुर्तता न केल्याने आपली फसवणुक केल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे. दरम्यान, धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन महाविकास आघाडी तर्फे मुलुंड मध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी मुलुंडकरांनी मोठ्या प्रमाणात सह्या करुन धारावी प्रकल्पाला विरोध दर्शविला. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील व महाविकास आघाडीच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना फळांचा रस देऊन उपोषण सोडायला सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *