मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

मुंबई, दि. २ : शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करणे व त्यात सुधारणा करण्याच्या कामाशी जोडलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच मतदान केंद्र पर्यवेक्षकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी 2015 मध्ये अशा प्रकारची वाढ केली गेली होती. तसेच, मतदार नोंदणी अधिकारी (EROs) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (AEROs) पहिल्यांदाच मानधन देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, आयोगाने बिहारपासून सुरू झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कामासाठीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरता 6,000 रुपयांची विशेष प्रोत्साहनपर रक्कमेलाही मंजूरी दिली आहे.

आयोगाच्या या निर्णयातून मतदार याद्या बिनचूक असाव्यात यासह, मतदारांना मदत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर अथकपणे काम करत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्याप्रती आयोगाच्या वचनबद्धताही प्रतिबिंबित झाली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *