या देशात अल्पवयिन मुलांच्या यूट्यूब अकाऊंटवर बंदी

 या देशात अल्पवयिन मुलांच्या यूट्यूब अकाऊंटवर बंदी

मेलबर्न, दि. ३१ : ऑस्ट्रेलिया ने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर यूट्यूब अकाऊंट बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीच टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) या सोशल मीडियांवर बंदी घातलेली आहे. याबाबत ई-सेफ्टी कमिश्नर यांनी शिफारस केली होती. यूट्यूब हा एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. तरीदेखील यूट्यूबच्या माध्यमातून लहान मुलांपुढे पारंपरिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच हानिकारक कंन्टेंट आणले जाते, असा तर्क ऑस्ट्रेलियन सरकारने लावला आहे. या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese यांनी या डिजिटल युगात मुलांची सुरक्षा आणि त्यांचे मानसिक स्वास्थ याला आमचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली. या नव्या निर्णयानुसार 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना यूट्यूबवर अकाऊंट चालू करता येणार नाही. अकाऊंट न चालू करता ते यूट्यूबवर व्हिडीओ पाहू शकतात.

ऑस्ट्रेलियातील ई-सेफ्टी कमिश्नरनुसार 10 ते 15 वयोगट असणारे ऑस्ट्रेलियातील चार पैकी तीन मुलं हे नियमितपणे यूट्यूब वापरतात. यामुळे हे माध्यम टिकटॉक आणि इन्स्टाग्रापेक्षाही प्रसिद्ध झाले आहे. आम्ही सर्वेक्षण केल्यानंतर साधारण 37 टक्के मुलांनी यूट्यूबवर आम्हाला हानिकारक कन्टेट दिसून आला, असे सांगितल्याचे ई-सेफ्टी कमिश्नर यांनी सांगितले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *