जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत १२ हजार क्युसेक विसर्ग

छ. संभाजीनगर दि ३१– जायकवाडी धरणात आज संध्याकाळी ४ वाजता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरेही उपस्थित होते. यानंतर धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदी पात्रात तब्बल १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
सध्या धरणात उर्ध्व भागातून १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, पाणीपातळी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आवश्यकतेनुसार विसर्ग नियंत्रितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ML/ML/MS