विश्वविजेती ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचे जल्लोषात स्वागत..

नागपूर दि ३१ — जागतिक फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती ठरलेली नागपूरची ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचे काल रात्री नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर दिव्या देशमुख हिचे आगमन होताच चाहत्यांतर्फे दिव्या हिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळाचा बाहेर चेस चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती .
लहान मुले, युवक, युवतींनी यावेळी दिव्याचे पोस्टर हातात घेत आणि दिव्या चा समर्थनात घोषणा देत तिचे नागपुरात अभिनंदन आणि स्वागत केले . नागपुरात प्रथम आगमन होत असल्याचा पार्श्वभूमीवर नागपुर चेस असोसिएशन आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी दिव्याचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी चाहत्यांनी ढोल ताशांचा गजरात, फटाके फोडून, गुलाल उधळून दिव्याचे नागपुर विमानतळावरुन ते तिच्या शंकरनगर येथील राहत्या घरापर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात आली होती. दिव्या ने मी आनंदित असून देशासाठी आणखी पुढे खेळायचे आहे, देशाचे नाव मोठे करायचे असल्याची प्रतिक्रिया दिली.. ML/ML/MS