वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा!

पनवेल, दि २९: वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये, त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले कि, दिनांक ०५ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक भरभरून शुभेच्छा देत असतात आणि या शुभेच्छांमुळे मला चांगली आणि अधिक कामे करण्याची सातत्याने प्रेरणा मिळत असते. आपले नेते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा होडींग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्रात जाहिरात देऊ नका, त्यापेक्षा तो खर्च सामाजिक कार्यासाठी करा, असे आवाहन केले. त्या अनुषंगाने मी सुद्धा आपल्या नेत्याचे अनुकरण करत त्याच धर्तीवर मी सर्वाना आवाहन करीत आहे कि, माझ्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात, बॅनर, होर्डिंग्ज यावर खर्च करू नका, त्यापेक्षा हा खर्च सामाजिक कार्यात करावा. आणि त्या अनुषंगाने आपल्यावर असलेले प्रेम सामाजिक कार्यातून व्यक्त करावे, असेही त्यांनी आपल्या आवाहनातून अधोरेखित केले. KK/ML/MS